हनुमान भक्तांवर शनिदेवाची कृपा का राहते?

 


जस की आपल्याला माहीतच आहे की शनि देवाला न्यायाचा देवता म्हणतात. सूर्यपुत्र शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न करतो. असे मानले जाते कि शनिदेवाच्या प्रकोपाने व्यक्तीचे वाईट दिवस येण्यास सुरुवात होते. परंतु तुम्हाला माहित आहे का कि शनिदेव हनुमानजींच्या भक्तांना कधीही त्रास देत नाहीत. आता मी तुम्हाला यामागचे कारण सांगतो.

याविषयी तीन कथा प्रसिद्ध आहेत.

पहिल्या कथेनुसार, ज्यावेळी रावणाचा पुत्र मेघनादचा जन्म झाला होता त्यावेळी आकाशात शनिदेवांचा खूप प्रभाव होता. याच प्रभावामुळे मेघनादच्या अमर होण्याचा योग्य संपुष्टात आला होता. ही गोष्ट रावणाला समजल्यानंतर रावणाला खूप राग आला. रावण खूप मोठा योगी होता. रागाच्या भरात रावणाने आपल्या योगाच्या जोरावर शनिदेवाला लंकेत कैद केले.

त्रेतायुगात ज्यावेळी माता सीतेला प्रभू श्रीरामांनी दिलेली अंगठी देण्यासाठी हनुमानजी जेव्हा लंकेत गेले तेव्हा त्यांनी शनिदेवांना तेथे कैद  असल्याचे पाहिले. हनुमानजी शनिदेवांला तेथे पाहून हैराण झाले आणि शनिदेवांला यामागचे कारण विचारले. तेव्हा शनिदेवानी सांगितले  'रावणाने त्याच्या योगबलाने मला कैद केले आहे.' शनिदेवानी हनुमानाजींकडे आपल्याला सोडवण्यासाठी आग्रह केला. यानंतर जेव्हा हनुमानजींनी त्यांची कैदेतून सुटका केली तेव्हा त्यांनी खुश होऊन हनुमानाजींना वर मागण्यास सांगितले. तेव्हा हनुमानजी म्हणाले की कलियुगात जो पण माझा भक्त असेल व माझी भक्ती करेल त्याला कधीही त्रास देऊ नका. त्या वेळेपासूनच हनुमानाजींचीही पूजा शनिवारी करण्यात येते व सर्व हनुमान भक्तांवर शनिदेवाची कृपा राहते. असे मानले जाते की लंका सोडताना शनिदेवानी लंकेवर वक्र दृष्टी टाकली त्यामुळेच रावण आणि त्याच्या कुळाचा संपूर्ण नाश झाला.

 

याशिवाय आणखी एक कथा आहे. एका वेळी हनुमानजी प्रभू श्रीरामांचे स्मरण करत होते. त्यावेळी शनिदेव तेथे आले. आणि म्हणाले आता कलियुगास सुरुवात झाली आहे. या युगात तुमचे शरीर दुर्बल झाले आहे आमी माझे शरीर मजबूत आहे. आता मी तुमच्या शरीरावर साडेसाती बनून येत आहे. शनिदेवांना माहित नव्हते की हनुमानजी प्रभू श्रीरामांचे किती मोठे भक्त आहेत व त्यांच्या शरीरावर कुठल्याही साडेसातीचा प्रभाव होणार नाही. तेव्हा हनुमानजी शनिदेवांला म्हणाले 'कृपया मला प्रभूंचे स्मरण करू द्या. माझ्या शरीरावर व आत्म्यावर प्रभू श्रीरामांशिवाय कोणीही राज करू शकत नाही'. 

परंतु शनिदेव मानण्यास तयार झाले नाहीत. ते म्हणाले 'संपूर्ण श्रुष्टीवर माझी दृष्टी आहे आणि तुम्ही यापासून दूर राहू शकत नाहीत.' त्यानंतर हनुमानजी शनिदेवांला म्हणाले 'ठीक आहे तर मग तुम्ही माझ्या शरीरावर कोठे वास करू इच्छिता?' त्यावेळी शनिदेव एकदम गर्वाने म्हणाले 'मी पहिले अडीच वर्ष डोक्यात बसून बुद्धीला विचलित करतो, पुढच्या अडीच वर्षात हृदयात बसून रोगी बनवतो व शेवटच्या अडीच वर्षात पायांमध्ये वास करून भटकवत राहतो.' असे म्हणून शनिदेव हनुमानाजींच्या डोक्यावर बसले. हनुमानाजींनी आपल्या डोक्यावर खूप मोठा पर्वत ठेवला. हे पाहून शनिदेव घाबरले. ते म्हणाले 'हनुमानजी हे काय करत आहात?' हनुमानजी म्हणाले 'मी माझी खाज मिटवत आहे.' असे म्हणून हनुमानाजींनी अजून एक पर्वत आपल्या डोक्यावर ठेवला. तेव्हा घाबरून शनिदेव म्हणाले 'ठीक आहे मी कधीही तुमच्या जवळ फिरकणार नाही.' तेव्हा हनुमानाजींनी आणखी एक पर्वत आपल्या डोक्यावर ठेवला. तेव्हा शनिदेव म्हणाले की मी तुम्हाला तसेच तुमच्या भक्तांनाही कधीही त्रास देणार नाही.

हेच कारण आहे कि शनिदेव हनुमानजींच्या भक्तांना कधीही त्रास देत नाहीत. जर तुम्हीही हनुमानाजींचे भक्त असाल तर तुम्हालाही शनिदेवाला घाबरण्याची गरज नाही. शनिदेव आपली कृपा तुमच्यावर सदैव ठेवतील.

जय शनिदेव, जय हनुमान, जय श्री राम

 

मित्रानो तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा.

 

धन्यवाद.


Post a Comment

0 Comments