ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे?

 


असे म्हणतात की देवांचे देव आहेत त्रिदेव ब्रम्हा, विष्णू आणि महेश. ब्रम्हाजीला सृष्टीचा निर्माता, भगवान विष्णूला सृष्टीचा रक्षक आणि महादेवाला सृष्टीचा विनाशक असे म्हटले जाते. आता काही जणांना प्रश्न पडला असेल की त्रिदेवांची उत्पत्ती कशी झाली? त्रिदेवांमध्ये सर्वात शक्तिशाली कोण आहे?

 

याविषयी तीन कथा प्रसिद्ध आहेत.

 

पहिली कथा शिव पुराणातील आहे. जेव्हा एकदा ब्रम्हाजी व भगवान विष्णू मध्ये वाद झाला की दोघांमधील मोठा/श्रेष्ठ कोण आहे, वाद एवढा मोठा होता की  दोघांमध्ये युद्धाची वेळ आली. त्यावेळी त्यांच्या मध्ये एक अग्निस्तंभ प्रकट झाला. त्या वेळी त्यांनी ठरवले की जो कोणी सर्वात आधी या अग्निस्तंभाच्या टोकाला पोहोचेल तो श्रेष्ठ असेल. यानंतर भगवान विष्णू स्तंभाच्या टोकाला पोहोचण्यासाठी खालच्या बाजूस जाऊ लागले व ब्रम्हाजी वरच्या बाजूस जाऊ लागले. दोघांपैकी कोणीही टोकाला पोहचू  शकले नाही. तेव्हा भगवान विष्णूंनी आपली हार कबूल केली. परंतु ब्रम्हाजीनी आपण टोकाला पोहोचल्याचे खोटे सांगितले. ब्रम्हाजीनी खोटे बोलताच त्या अग्निस्तंभातून भगवान शिव प्रकट झाले आणि ब्रम्हाजींच्या पाच तोंडांपैकी जे तोंड खोटे बोलले ते तोंड कापून टाकले व शाप दिला की जगात त्यांची कोणीही पूजा करणार नाही. त्याचसोबत भगवान विष्णूंना आपल्यासोबत पुजले जाण्याचे वरदान दिले. ही कथा शिवपुराणातील असून यामध्ये भगवान शिव सर्वात श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे.

 


दुसरी  कथा सप्तऋषींची आहे. एकदा सप्तऋषींमध्ये चर्चा होत होती की ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे? म्हणून त्यांनी त्रिदेवांची परीक्षा घेण्याचे ठरवले. ही परीक्षा घेण्याची जबाबदारी भ्रगु ऋषींवर सोपवण्यात आली. भ्रगु ऋषी सर्वप्रथम परमपिता ब्रम्हाजींकडे गेले व त्यांचा अपमान केला. ब्रम्हाजी खूप क्रोधीत झाले. यानंतर भ्रगु ऋषी महादेवाकडे गेले व त्यांचा अपमान केला. तेही क्रोधीत झाले. शेवटी भ्रगु ऋषी भगवान विष्णूकडे गेले. त्यावेळी म्हागवान विष्णू आराम करत होते. भ्रगु ऋषींनी त्यांच्या छातीवर लाथ मारली. त्यांच्या अशा वागण्याने भगवान विष्णूंना जराही राग आला नाही. त्यांनी भ्रगु ऋषींचे पाय पकडले व त्यांना विचारले की तुमच्या पायाला जखम तर झाली नाही ना कारण माझी छाती खूप कठोर आहे. माझ्या छातीमुळे तुमच्या छातीला जखम होऊ शकते. भगवान विष्णूंचे बोलणे ऐकल्यावर भृगु ऋषींनी त्यांची माफी मागितली. त्यानंतर सप्तऋषींनी मानले की त्रिदेवांमध्ये भगवान विष्णू सर्वश्रेष्ठ आहेत.

 


तिसऱ्या कथेनुसार, एकदा ब्रम्हा, विष्णू आणि महेश सोबत बसले होते. तेव्हा शिवजींनी विचार केला की जर मी सृष्टीचा विनाशक असेल तर मी कोणाचाही विनाश करू शकतो का? मी ब्रम्हाजी आणि विष्णूजींचाही विनाश करू शकतो का? शिवजींच्या या विचाराने ब्रम्हाजी व विष्णूजी हसले. ब्रम्हाजी म्हणाले की तुम्ही तुमच्या शक्तींचा वापर माझ्यावर करा कारण मलाही जाणून घ्यायचे आहे की माझ्यावर तुमच्या शक्तींचा काय परिणाम होतो. जेव्हा शिवजींनी आपल्या शक्तीचा वापर ब्रम्हाजींवर केला तेव्हा ब्रम्हाजीची जळून राख झाली. भगवान शिवजींना खूप चिंता वाटू लागली की आता या सृष्टीचे काय होईल? तेव्हा त्या राखेतून आवाज आला महादेव मला काहीही झाले नाही. तुमच्या शक्तींमुळे माझी राख निर्माण झाली. आणि जेथे काही निर्माण होते तेथे मी असतो.

यानंतर भगवान विष्णू हसले आणि म्हणाले मी या सृष्टीचा संरक्षक आहे. मलाही जाणून घ्यायचे आहे की तुमच्या शक्तीचा परिणाम माझ्यावर काय होतो? तेव्हा भगवान शिवजींनी आपल्या शक्तीचा वापर विष्णूजींवर केला. तेव्हा त्यांचीही राख झाली. त्या राखेतून आवाज आला महादेवजी मी इथेच आहे. तेव्हा शिवजींनी परत एकदा आपल्या शक्तीचा वापर केला. तेथील सर्व राख गायब झाली. मात्र राखेचा एक कण तेथेच राहिला. त्यातून विष्णूजी परत प्रकट झाले. महादेवजींना कळाले की विष्णूजींना कोणीही मारू शकत नाही.

महादेवजींनी विचार केला की जर मी स्वतःचा विनाश केला तर ब्रम्हा व विष्णूजींचा नाश होईल का? जर मीच राहिलो नाही तर विनाश राहणार नाही. जर विनाश राहिला नाही तर रचना होणार नाही. तसेच त्याच्या संरक्षणाची सुद्धा गरज राहणार नाही. विष्णूजी हे ऐकून मनातल्या मनात हसत होते आणि त्यांना समजले की महादेवजी काय करणार आहेत. शिवजींनी स्वतःला भस्म करून घेतले व त्यांची तेथे राख झाली. त्यानंतर लगेच ब्रम्हाजी व विष्णूजींचीही राख झाली. आता त्या राखेतून आवाज आला, येथे निर्माण झाले आहे. जेथे निर्माण होते तेथे मी असतो. असे म्हणत ब्रम्हाजी तेथे प्रकट झाले व लगेच विष्णुजीही प्रकट झाले. त्यानंतर लगेच महादेवजीही प्रकट झाले. कारण जेथे निर्माण होते तेथे संरक्षक व विनाशकही अस्तित्वात येतात. अशा प्रकारे शिवजींना कळून चुकले की त्रिदेवांचा विनाश असंभव आहे. ही घटना लक्षात ठेवण्यासाठी शिवजींनी ही राख आपल्या शरीराला लावली. तेव्हापासून त्यांना शिवभस्म म्हणून ओळखले जाऊ लागले.


या कथेतून असे लक्षात येते कि त्रिदेवांची एकमेकांशी तुलना करणे व्यर्थ आहे. आपल्याला फक्त त्यांची भक्ती करायला हवी. कारण जेथे निर्माण होते तेथे ब्रम्हाजी असतात. त्या निर्माणच्या संरक्षणासाठी भगवान विष्णू आहेत, तर त्या निर्माणाची कधी ना कधी विनाशासाठी भगवान महादेव तेथे असतात. त्यामुळे या सृष्टीला चालवण्यासाठी या तिघांचीही गरज आहे.

 

ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.

Post a Comment

0 Comments