जाणून घ्या दिवाळी या सणाविषयी संपूर्ण माहिती

 

भारतामध्ये साजरा केला जाणारा सर्वात मोठा आणि महत्वाचा हिंदू सण म्हणजे दिवाळी सर्व धर्मीय लोक मोठ्या आनंदाने साजरा करतात. दिवाळी हा सण सणांचा राजा म्हणून ओळखला जातो.  दिवाळी हा सण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. दिवाळी हा सण रोषणाईचा, उत्साहाचा, मानवतेचा सण आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष  महत्व दिले जाते. दिवाळी या शब्दाचा अर्थ 'रोषणाईचा सण' किंवा 'दीपोत्सव' असा होतो. संस्कृत भाषेमध्ये दिवाळीस 'दीपावली' असे म्हणतात. दीपावली शब्दाचा अर्थ 'दिव्यांची रांग' असा केला जातो.

दिवाळी हा सण अश्विन महिन्याच्या शेवटी म्हणजेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मोठ्या उल्हासात व धूमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये अंधाऱ्या रात्री आकाश कंदील, जगमगत्या दिव्यांनी संपूर्ण घर सजवले जाते. फटाक्यांची आतेशबाजी केली जाते. मिठायांचे आदान प्रदान केले जाते.

दिवाळीचा दिवस म्हणजे तो दिवस ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीतेसह अयोध्येत परतले होते व त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी संपूर्ण अयोध्या रोषणाईने सजवली होती. प्रभू श्रीराम १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या राज्यात परत आले होते तसेच त्यांनी महामायावी रावणाचा वध केल्यामुळे त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत होते.

दिवाळीला आंब्याच्या पानांचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्य प्रवेशद्वारावर लावले जाते. मुख्य प्रवेशद्वारावर वेगवेगळ्या रांगोळी काढल्या जातात व घरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. हिंदू धर्मामध्ये शुभ मानले जाते. घराच्या सर्व बाजू तेलाचे दिवे लावून घर सजवले जाते त्यामुळे दिवाळी हा सण 'दीपोत्सव' म्हणून ओळखला जातो. बरेच लोक काही नवीन वस्तू खरेदी करतात. काही जण सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. तज्ज्ञांच्या मते या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवाळीमध्ये बाजारात खूपच उत्साहाचे वातावरण असते. लोक मिठाई, कपडे आणि जरुरी वस्तूंच्या दुकानात मोठी गर्दी करतात.

दिवाळीचे पाच दिवस

दिवाळी हा सण पाच दिवस चालतो. पाच दिवस चालणारा दिवाळी हा उत्सव खूप आनंदाचा असतो. लोकं एक दोन आठवडे आधीपासूनच दिवाळीची तयारी सुरु करतात. यामध्ये घराची साफसफाई करणे, रंगरंगोटी करणे, कुटुंबातील सर्वांसाठी नवीन कपडे खरेदी करणे, दाराला आकाश कंदील लावणे यांचा समावेश होतो.

 

दिवस पहिला : धनत्रयोदशी

दिवाळीच्या पाच दिवसांची सुरुवात ही धनत्रयोदशी या दिवसाने होते. या दिवशी लोक नवीन वस्तू, सोने, चांदी खरेदी करतात. संपूर्ण घर दिव्यांनी सजवतात. धनाची देवी धन्वंतरीची पूजा करतात.  असे म्हणतात कि धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरी देवीचा जन्म दिवस असतो. या दिवशी देवाची उपासना करून आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्य आणि समृद्धीची कामना केली जाते. बऱ्याच लोकांचे असे मानणे आहे कि या दिवशी देवी लक्ष्मी गृहप्रवेश करते व त्यामुळे दारिद्र्याचे पतन होते. या वर्षी धनत्रयोदशी २ नोव्हेंबर ला आहे.

 

दुसरा दिवस : नरकचतुर्दशी

दिवाळीचा हा दुसरा दिवस छोटी दिवाळी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सूर्य उगवण्याच्या आत अंघोळ केली जाते.

 

दिवस तिसरा : दिवाळी-लक्ष्मीपूजन

पाच दिवसांच्या या उत्सवात हा सर्वात महत्वाचा दिवस असतो ज्याला आपण दिवाळी असे म्हणतो. या दिवशी मोठ्या थाटामाटात व रितीरिवाजात माता लक्ष्मी, भगवान श्री गणेश आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते.

 

चौथा दिवस : पाडवा

पाडवा हा दिवाळीचा चौथा दिवस असतो. या दिवशी बरेच लोक गोवर्धन पूजा करतात. ग्रामीण

भागात आपल्या घरातील गाई, बैल व म्हशींना दिवाळीचे मिष्ठान्न खायला देतात. या वर्षी (२०२१) ५ नोव्हेंबर ला पाडवा आहे.

 

पाचवा दिवस : भाऊबीज

दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज. हा दिवस म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाच्या नात्याचा दिवस असतो. या दिवशी विवाहित बहिणी आपल्या माहेरी येतात. या दिवशी बहीण आपल्या भावाला दिव्यांची आरास व आत्मीयतेने ओवाळून त्यांच्या भरभराटीची शुभ कामना करतात. भाऊ आपल्या बहिणीला उपहार देतात. हा दिवस रक्षाबंधनाइतकाच पवित्र मानतात.

या वर्षी (२०२१) ६ तारखेला भाउबीज आहे.

 

ही माहिती आवडली असल्यास नक्की सांगा. आपल्या मित्रांना, फॅमिली ग्रुपमध्ये ही माहिती नक्की शेअर करा.

Post a Comment

0 Comments