मित्रांनो पौराणिक काळातील मित्रतेची गोष्ट आली की
सर्वांना श्रीकृष्ण व सुदामाची मित्रता आठवते. लोक विचार करतात की भगवान श्रीकृष्ण
किती दयाळू व समानता मानणारे होते जे एका गरीब ब्राह्मणासाठी अनवाणी पायाने
महालाच्या दरवाज्यापर्यंत आले आणि सुदामाची गरिबी दूर केली. ही गोष्ट तर सर्वानाच
माहित आहे. पण तुम्हाला माहित आहे का की सुदामाचा त्याच्या केलेल्या पापांमुळे
भगवान शिवजींनी वध केला. चला तर मग आज
जाणून घेऊया की शेवटी भगवान शिवजींना सुदामाचा वध का करावा लागला.
स्कंदपुराणात वर्णित केलेल्या कथेनुसार गोलोकामध्ये सुदामा
व विराजा नावाची कन्या राहत होती. विराजा भगवान श्रीकृष्ण वर प्रेम करत होती.
सुदामा विराजावर प्रेम करत होता. एकदा काय झाले विराजा श्रीकृष्णकडे गेली
त्याचवेळी राधा तेथे आली. राधाने जेव्हा त्या दोघांना एकत्र पहिले तेव्हा तिने
रागाच्या भरात विराजाला श्राप दिला की विराजा गोलोकातून पृथ्वीलोकात राहील. इकडे
सुदामाने राधाला श्राप दिला. राधानेसुद्धा सुदामाला श्राप दिला
की सुदामा पृथ्वीलोकात राक्षस म्हणून जन्म घेईल. यानंतर सर्वजण आपापल्या घरी
परतले.
काही वर्षांनंतर सुदामाने दानवराज दंभ च्या घरी पुत्र
म्हणून जन्म घेतला. त्याचे नाव शंखचूर्ण ठेवण्यात आले. तिकडे विराजा धर्मध्वज
याच्या घरी तुलसी या नावाने जन्म घेतला. जेव्हा शंखचूर्ण मोठा झाला, तेव्हा
तो पुष्कर येथे जाऊन ब्रम्हाजींना प्रसन्न करण्यासाठी तापस्या करू लागला. काही वर्षानंतर त्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन
ब्रम्हाजी त्याच्यासमोर प्रकट झाले आणि शंखचूर्णला वर मागण्यास सांगितले. शंखचूर्ण
ब्रम्हाजींना म्हणाला 'मला असा वर द्या ज्यामुळे मी सर्व देवांना
अजेय होईल.' ब्रम्हाजी म्हणाले 'तथास्तु,
असेच होईल.' त्यानंतर
त्यांनी शंखचूर्णला एक दिव्य श्रीकृष्ण कवच दिले जे सर्वत्र विजय प्राप्त करून
देणारे होते. त्यानंतर ब्रम्हाजीनी शंखचूर्णला बद्रिवनात जाण्याची सूचना केली.
तिकडे धर्मध्वज ची कन्या तुलसी तपस्या करत होती. तिच्याशी विवाह करण्यास सांगितले.
शंखचूर्णने कवच परिधान केले व तो लगेचच बद्रिकाश्रमात
जाण्यास निघाला. शंखचूर्णला बद्रिकाश्रमात तुलसी जेथे
तपस्या करत होती तेथे पोहोचला. त्याने तुलसीला आपल्या पूर्वजन्मीची व या जन्मात
झालेली सर्व हकीगत सांगितली. तेव्हा तेथे ब्रम्हाजी प्रकट झाले व त्यांनी त्या
दोघांचा विवाह घडवून आणला. त्यानंतर शंखचूर्ण तुलसीला घेऊन आपल्या राज्यात परतला.
काही काळानंतर देवगुरु शुक्राचार्यांनी शंखचूर्णला
दानवांचा राजा बनवले. त्यानंतर त्याने देवांवर आक्रमण केले. ब्रम्हाजींच्या
आशीर्वादामुळे त्याचा कोणीही पराभव करू शकले नाही. सर्व देव पळून जाऊ लागले.
तेव्हा देवी भद्रकालीने शंखचूर्णसोबत युद्ध पुकारले. युद्ध खुपवेळ चालले. तेव्हा
तेथे आकाशवाणी झाली 'देवी भद्रकाली, तू
शंखचूर्णचा पराभव करू शकणार नाही कारण त्याच्याकडे श्रीकृष्ण कवच आहे. तसेच याच्या
पत्नीचे सतीत्व जोपर्यंत अखंडित आहे तोपर्यंत याचा पराभव करणे अशक्य आहे.' हे
ऐकूण देवी भद्रकाली भगवान शिवजींकडे गेली व झालेली हकीकत सांगितली. भगवान शिवजी
विष्णूंकडे गेले व त्यांना शंखचूर्ण चा वध करण्यास सांगितले. त्यानंतर भगवान
विष्णू एका गरीब ब्राम्हणाचा वेष धारण करून शंखचूर्णकडे गेले. शंखचूर्णने
विष्णूजींना विचारले 'गुरुदेव तुम्हाला काय भिक्षा पाहिजे?' श्रीकृष्ण
म्हणाले 'मला आधी वचन दे कि मी जे मागेल ते मला देशील.' शंखचूर्णने
होकार दिला. भगवान विष्णूनी त्याच्याकडे दिव्य कवच मागितले. शंखचूर्णने आपल्या
प्राणापेक्षा प्रिय कवच देऊन टाकले.
त्यानंतर भगवान विष्णूंनी शंखचूर्णचे रूप घेऊन
तुलसीकडे गेले व तिचे सतीत्व नष्ट केले. तुलसीला
जेव्हा कळाले की हा शंखचूर्ण नाही तेव्हा ती खूप क्रोधीत झाली. तेव्हा
शिवजी तेथे प्रकट झाले व तिला म्हणाले 'हे तुझ्या तपस्येचेच फळ आहे, आता
तू या शरीराचा त्याग करून आपल्या लक्ष्मीरुपात येऊन वैकुंठात वास करावा. तू या
शरीराला सोडशील तेव्हा ते नदीचे रूप घेईल ही नदी पुण्यरूपी गंडकीच्या नावाने ओळखली
जाईल.' श्रीहरी तुझ्या शापामुळे गंडकी नदीजवळ दगड बनून
राहतील. या दगडाला लक्ष्मीनारायण म्हणूनही ओळखले जाईल. त्यानंतर शिवजी तेथून निघून
गेले व शंखचूर्णचा वध केला. तुलसीनेही आपला देहत्याग केला व भगवान विष्णूंसोबत
वैकुंठात निघून गेली. शरीराचा जेथे त्याग केला तेथे गंडकी नदी तयार झाली.
तर मित्रानो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की
सांगा. ही कथा आवडली तर आपल्या मित्रांना,
नातेवाईकांना शेयर करा.
अशाच प्रकारच्या आणखी कथांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा. धन्यवाद.
0 Comments