अंगठा कापल्यानंतर एकलव्यचे काय झाले?

 


    मित्रानो महाभारतातील एक अज्ञात पात्र ज्याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे आणि ज्यांना माहिती आहे त्यांना फक्त एवढंच माहिती आहे कि तो एक धनुर्धारी होता. ज्याला गुरु द्रोणाचार्यांनी शिकवण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्याने द्रोणाचार्यांचा पुतळा बनवून त्यांना आपले गुरु मानून धनुर्विद्या प्राप्त केली. त्यानंतर द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्य चा अंगठा मागितला. परंतु आज आपण जाणून घेऊ कि अंगठा कापल्यानंतर एकलव्य चे काय झाले आणि तो कोण होता ज्याने एकलव्यचा वध केला?

    सर्वात आधी आपण जाणून घेऊ कि एकलव्य कोण होता. महाभारतानुसार द्वापारयुगात प्रयागराजजवळ श्रंगवेरपूर नावाचे एक राज्य होते. त्या राज्याचा राजा हिरण्यधनु हा होता. एकलव्य निषादराज हिरण्यधनुचाच पुत्र होता. महाभारत काळात निषाद लोकांना शुद्र मानले जात होते म्हणून या राज्याबद्दल जास्त काही वाचायला मिळत नाही. एकलव्यचे लहानपणीचे नाव अभिद्युम्न होते. काही लोकांच्या मते एकलव्यचे नाव अभय हे होते. तसेच हरिवंशपुराणानुसार एकलव्य हिरण्यधनुचा दत्तक पुत्र होता ज्याचा जन्म भगवान श्रीकृष्ण यांच्या काकांच्या येथे झाला होता. जेव्हा ज्योतिष्यांनी त्याचे भविष्य पहिले तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार एकलव्यला हिरण्यधनुकडे सोपवण्यात आले. हरिवंशपुराणानुसार अभय हा एक क्षत्रिय पुत्र होता, शुद्र नव्हे.

अभय कसा बनला एकलव्य?

    एकलव्य लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचा होता. जेव्हा त्याची गुरुकुलमध्ये शिक्षा चालू झाली तेव्हा त्याची बुद्धी, मेहनत व एकनिष्ठता पाहून त्याच्या गुरुंनी त्याचे नाव एकलव्य असे नाव ठेवले. त्याच गुरुकुलामध्ये जेव्हा पुलक मुनींनी त्याची धनुर्विद्या शिकण्याची इच्छा, मेहनत व आत्मविश्वास पहिला तेव्हा ते निषादराज हिरण्यधनुला म्हणाले कि तुमच्या मुलामध्ये एक धनुर्धारी बनण्याचे सर्व गुण आहेत. यासाठी एका चांगल्या गुरूची गरज आहे. पुलक मुनींच्या सांगण्यावरून हिरण्यधनु एकलव्यला घेऊन गुरु द्रोण यांच्याकडे गेले आणि एकलव्य ला त्यांचा शिष्य बनवण्याचा आग्रह केला. एकलव्यने गुरु द्रोणाचार्यांना आपले गुरु मानले होते. परंतु राजपुत्र सोडून इतर कोणालाही ते शिक्षण देत नाहीत असे म्हणून द्रोणाचार्यांनी त्याला शिक्षण देण्यास नकार दिला. गुरु द्रोणाचार्यांचे बोलणे ऐकून ते निराश झाले व ते निघून आले. एकलव्यने द्रोणाचार्यांना आपले गुरु मानले होते व त्याला माहित होते कि द्रोणाचार्यच त्याला चांगली धनुर्विद्या शिकवू शकतात.  त्यानंतर त्याने द्रोणाचार्यांच्या आश्रमाजवळील वनामध्ये द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला. त्या पुतळ्याला गुरु मानून धनुर्विद्येचा सराव करू लागला.

Image Credit : http://hindimind.in

    काही महिन्यानंतर एकदा द्रोणाचार्य कौरव व पांडवांना धनुर्विद्या शिकवत होते, त्यावेळी त्यांना एका कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे सर्वांचे लक्ष विचलित झाले. काही वेळाने कुत्र्याचा आवाज थांबला. आवाज थांबताच सार्वजन चकित झाले. सार्वजण जेथून कुत्र्याचा आवाज येत होते त्या दिशेने निघाले. तेथे गेल्यावर त्यांनी पहिले कि एका कुत्र्याचे तोंड बाणांनी भरले आहे व रक्ताचा एक थेंबही आला नाही. हे पाहून सार्वजण चकित झाले. गुरु द्रोणाचार्यांनी मोठ्याने ओरडून विचारले की हे कोणी केले आहे? तेव्हा एकलव्य त्यांच्याजवळ आला व प्रणाम करून म्हणाला ‘तुमच्या कृपेने मीच या कुत्र्याचे हे हाल केले आहेत.’ हे ऐकून द्रोणाचार्यांनी त्याला विचारले ‘तू कोण आहेस आणि मी तुझा गुरु कसा?’ तेव्हा एकलव्यने सगळी हकीगत सांगितली.

    एकलव्यची गोष्ट ऐकून त्यांचे  मन भरून आले. ते मनातल्या मनात म्हणाले की एकलव्यला शिष्य न बनवून त्यांनी खूप मोठी चूक केली आहे. त्याला जवळ घेण्यासाठी ते पुढे सरसावले परंतु त्यांना अर्जुनला दिलेले वचन आठवले. त्यांनी अर्जुनला वचन दिले होते की ते अर्जुनला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवतील. ते अर्ध्यातच थांबले व म्हणाले मला माझा पुतळा दाखव. तेव्हा एकलव्य त्या सर्वाना घेऊन पुतळ्यापाशी गेला. ते पाहून गुरु द्रोणाचार्य मनातल्या मनात प्रसन्न झाले. त्यांना वाटले एकलव्य जर असाच सराव करत राहिला तर जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनेल. ते एकलव्यला म्हणाले ‘तू मला गुरु मानतोस, तुला हेही माहित असेल की गुरुदक्षिणा दिल्याशिवाय कोणतीही विद्या सफल होत नाही. मी तुला आजपासून शिष्य मानले आहे म्हणून मला गुरुदक्षिणा पाहिजे.’ एकलव्य खूप आनंदी झाला. एकलव्य म्हणाला ‘गुरुदेव तुम्ही मला शिष्य बनवले, मी धन्य झालो. सांगा काय गुरुदक्षिणा पाहिजे तुम्हाला?’ तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले ‘गुरुदक्षिणेत मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा पाहिजे.’ हे ऐकून एकलव्य चकित झाला पण लगेच आपल्याजवळील चाकूने उजव्या हाताचा अंगठा कापला आणि द्रोणाचार्यांच्या पायाजवळ ठेवला. हे पाहून द्रोणाचार्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. थोड्या वेळाने ते एकलव्यला म्हणाले ‘वत्स आतापर्यंत माझे खूप शिष्य झाले आणि पुढेही होतील, परंतु तुझ्यासारखा शिष्य मिळणे खूप कठीण आहे.’ त्यानंतर ते सार्वजण परत आपल्या आश्रमात परतले. तिकडे एकलव्य पण आपल्या श्रंगवेरपूर या राज्यात परतला आणि अंगठ्याविनाच धनुर्विद्येचा सराव करू लागला. तो एक धनुर्धारी बनला.


    काही वर्षानंतर हिरण्यधनुने आपला निषादमित्राची मुलगी सुनितासोबत एकलव्य चा विवाह केला. काही वर्षानंतर वडिलांचे निधन झाल्यानंतर तो तिथला राजा बनला. राजा बनल्यानंतर निषाद लोकांना घेऊन सेना उभा केली व आपली सीमा वाढवण्यास सुरुवात केली. अशातच तो मगधचा राजा जरासंधला जाऊन मिळाला जो भगवान श्रीकृष्णाचा कट्टर शत्रू होता. विष्णूपुराणानुसार जरासंधसोबत मित्रता केल्यानंतर एकदा जरासंधसोबत मिळून द्वाराकाविरूढ लढाई सुरु केली. बघता बघता एकलव्यने सर्व याद वसेनेचा नाश केला. भगवान श्रीकृष्णला याबद्दल माहिती कळताच ते एकलव्यला भेटायला आले. तेव्हा त्यांनी पहिले की तो फक्त चार बोटांनीच धनुष्य चालवत होता. श्रीकृष्णाला वाटले महाभारत युद्धात एकलव्य पांडवांसाठी धोका बनू शकतो म्हणून याचा नाश करणे खूप गरजेचे आहे. त्यांनी एकलव्यसोबत युद्ध केले जे खूप वेळ चालले. शेवटी श्रीकृष्णाच्या हातून एकलव्यचा वध करण्यात आला.

मित्रानो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडल्यास आपल्या मित्रांना, ग्रुपमध्ये शेयर करा.


Post a Comment

0 Comments