मित्रांनो
हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्काराबद्दल अनेक मान्यता आहेत ज्याबद्दल अधिकतर लोक
अज्ञात आहेत. अशीच एक मान्यता आहे कि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या
कुटुंबातील महिलांनी स्मशानात जाणे टाळावे. गरुड पुराणामध्ये महिलांना स्मशानात जाणे
वर्जित करण्यास सांगितले आहे तसेच त्याचे कारणही सांगितले आहे.
सध्याच्या
काळात महिला सर्रास स्मशानभूमीत जाताना दिसतात पण प्रत्येक हिंदूला जाणून घेणे
गरजेचे आहे कि पुराणात हे वर्जित का आहे ते. गरुड पुराणातील कथेनुसार महिलांना
पुरुषांपेक्षा कमजोर मनाचे मानले गेले आहे. अशी मान्यता आहे कि मृत शरीरास अग्नी
देताना जर कोणी रडत असेल तर तर त्या मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळत नाही आणि
मृत शरीरास जळताना महिला रडल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून महिलांना स्मशानात जाणे
वर्जित आहे. अशाच प्रकारे आणखी काही गोष्टी आहेत ज्या महिला व बालकांना पाहणे चांगले
नाही जसे अग्नी देण्याआधी मृत शरीराच्या कपाळावर काठीने मारले जाते जी एक परंपरा
आहे. महिला व बालकांना अशा प्रकारची दृश्ये विचलित करू शकतात. अनेक वेळा मृत शरीर
जळताना आवाज येतो हे दृश्य महिला व बालकांनी पाहणे चांगले नाही. यामुळे त्यांना या
प्रथेपासूनदूर ठेवणे उचित समजले गेले आहे.
हिंदू
धर्मामध्ये याबद्दल आणखी मान्यता आहेत. गरुड पुराणात अशी एक मान्यता आहे कि शव
स्मशानात घेऊन गेल्यावर घराला धार्मिक पद्धतीने पवित्र व शुद्ध करणे खूप आवश्यक
आहे. म्हणून हे कार्य विधीपूर्वक करणे खूप गरजेचे आहे. ही जिम्मेदारी महिला
चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतात. म्हणून पुरुषांना स्मशानभूमीत अग्निदाह
करण्याचे कार्य सोपवले आहे. तर दुसरे कार्य महिलांना सोपवले आहे ज्यात त्या
पुरुषांना अंघोळ करण्यास मदत करतात. जेव्हा मृत शरीरास अग्नी दिली जाते तेव्हा जंतू
व किटाणू हवेत उडून शरीरास चिकटतात त्यामुळे घरी आल्यावर आंघोळ करणे गरजेचे असते. असे
न केल्यास अशुभ मानले जाते तसेच नकारात्मक उर्जेचा प्रवेश मानले जाते.
असे
मानले जाते कि स्मशानभूमीत वाईट आत्म्यांचा वास असतो व ते पुरुषांपेक्षा महिलांकडे
जास्त आकर्षित होतात व त्यांना वशमध्ये करून त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. भूत
प्रेतांच्या प्रभावापासून वाचण्यासाठी महिलांना स्मशानात जाणे वर्जित मानले जाते.
आपल्या
संस्कृतीचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. परंतु काही लोक याला अंधश्रधा मानतात व
अनेक महिला अंत्यसंस्कारासाठी स्मशानात जाताना दिसतात. पुराणात दिलेल्या या कथा या
विनाआधारे सांगितल्या जात नाहीत. यांच्या मागे काही ना काही कारणे आहेतच.
अशाच
प्रकारच्या हिंदू धर्माविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा.
0 Comments