त्रिदेव
म्हणजेच ब्रम्हा ज्यांनी या सृष्टीची निर्मिती केली, विष्णू जे या सृष्टीचे
पालनहार आहेत आणि भगवान शिवजी जे या सृष्टीचे संहारक आहेत. या तिघांमुळेच ही
सृष्टी कायम आहे. आज आपण पाहणार आहोत सृष्टीचे पालनहार भगवान विष्णूंचे १० अवतार.
पहिला
अवतार : मत्स्य अवतार
भगवान विष्णूंचा पहिला अवतार होता
मत्स्य अवतार म्हणजेच एका माशाचा अवतार. भगवान विष्णूंनी मनुला जालप्रलायातून वाचवण्यासाठी
मत्स्य अवतार घेतला होता.
दुसरा
अवतार : कूर्म अवतार
भगवान
विष्णूंचा दुसरा अवतार होता कूर्म अवतार म्हणजेच महाकाय समुद्री कासवाचा अवतार. जेव्हा
देव आणि राक्षस अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन करत होते त्याला बुडण्यापासून
वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप घेतले होते आणि दोरखंडाची गरज
पडल्यामुळे त्यासाठी शेषनागाची मदत घेतली.
तिसरा
अवतार : वराह अवतार
भगवान विष्णूंचा तिसरा अवतार म्हणजे
वराह अवतार म्हणजेच एका डूक्कराचा अवतार. ते हिरण्याकश्यपला पराजित करण्यासाठी
प्रकट झाले होते. हिरण्याकश्यप एक राक्षस होता ज्याने पृथ्वीला ब्रम्हांड महासागराच्या
खाली नेले होते. असे मानले जाते कि वराह आणि हिरण्याकश्यपमध्ये युद्ध एक हजार
वर्षे चालली होती जी शेवटी वराहने जिंकली. वराह यांनी पृथ्वीला आपल्या दातांच्या
सहाय्याने समुद्रातून वर काढले.
चौथा
अवतार : नृसिंह अवतार
पाचवा
अवतार : वामन अवतार
Image source – hindusanatanadharmam.blogspot.com
भगवान विष्णूंचा
पाचवा अवतार होता वामन अवतार म्हणजेच एका बुटक्या माणसाचा अवतार. हिरण्याकश्यपचा
चौथा वंशज याने देवता इंद्र ला पराजीत करून तिन्ही लोकांवर कब्जा केला. देवांनी
भगवान विष्णूंकडे सुरक्षेची मागणी केली. तेव्हा भगवान विष्णूंनी एका बुटक्या
ब्राम्हणाचा अवतार घेतला. राजाच्या अश्वमेध यज्ञाच्या दरम्यान वामन बलीच्या जवळ
गेले. बली ने त्यांची कोणतीही मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले. वामन यांनी तीन
पावले जमीन मागितली. बली सहमत झाला. त्यानंतर वामन यांनी आपला आकार वाढवला. त्यांनी
आपले एक पाउल धरतीवर आणि दुसरे पूल स्वर्गावर ठेवले. बलीला कळून चुकले कि हा
विष्णूचाच अवतार आहे. सन्मानार्थ त्याने आपले मस्तक झुकवले आणि म्हणाला तुमचे
तिसरे पाउल माझ्या मस्तकावर ठेवा. विष्णूंनी तसेच केले यामुळे बलीला अमरता प्राप्त
झाली. त्यानंतर बली व त्यांचे आजोबा प्रल्हाद यांच्या सन्मानार्थ वामन यांनी
त्यांना पाताळ लोकांचा राजा बनविले.
सहावा
अवतार : परशुराम अवतार
Image source – https://commons.wikimedia.org
भगवान विष्णूंचा सहावा अवतार होता परशुराम अवतार म्हणजेच
कुऱ्हाड शस्त्र असलेला एक योद्धा. ते जमदग्नी व रेणुका यांचे पुत्र होते. त्यांना
भगवान शिवजींच्या तपस्येनंतर कुऱ्हाड मिळाली होती. असे मानतात कि ते पहिले
ब्राम्हण क्षत्रिय आहेत. राजा कार्तिविर्य अर्जुन आणि त्यांच्या सेनेने आश्रमात दौरा
केला. जाताना त्याने गाय कामधेनूची मागणी केली मात्र जमदग्नीने नकार दिला. क्रोधीत
झालेल्या राजाने संपूर्ण आश्रम नष्ट केला. आणि कामधेनूला आपल्या सोबत घेऊन गेला.
तेव्हा परशुरामाने राजाला महालामध्येच मारून टाकले. तसेच सर्व सेनेला नष्ट केले.
याचा बदला म्हणून कार्तिविर्य अर्जुनच्या पुत्रांनी जमदग्नीची हत्या केली.
परशुरामाने पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांना मारण्याची शपथ घेतली. परशुरामाने
क्षत्रियांच्या रक्ताने पाच तलाव भरले. शेवटी त्यांचे आजोबा ऋषी रुचेका त्यांच्या
समोर आले व परशुरामाला थांबवले. असे मानले जाते कि परशुराम चिरंजीव आहेत आणि आजही
महेंद्रगिरी पर्वतावर तपस्या करत आहेत.
सातवा अवतार : राम अवतार
Image source – https://www.patrika.com
भगवान
विष्णूंचे सातवे अवतार होते अयोध्येचे राजकुमार व राजा, मर्यादापुरुषोत्तम राम. त्यांची
कथा रामायणात वर्णीत केली आहे. त्यांची पत्नी सीता यांचे अपहरण लंकेतील राक्षस
रावण याने केले होते. प्रभू श्री रामांनीलंकेत जाऊन रावणाचा वध करून सीतेला परत
आणले. रामायण कथा जवळपास सर्वांनाच तोंडपाठ आहे.
आठवा अवतार : कृष्ण अवतार
Image source – https://www.flickr.com
भगवान विष्णूंचा आठवा अवतार होता कृष्ण अवतार. याची कथा
महाभारतात वर्णीत केली आहे. असे म्हटले जाते कि त्यांच्यामुळेच धर्म स्थापित झाला.
रामायाणाप्रमानेच महाभारत कथाही सर्वाना तोंडपाठ आहे.
नववा अवतार : भगवान बुद्ध
Image source – https://www.bhaktiphotos.com
भगवान विष्णूंचा नववा अवतार होते भगवान बुद्ध. बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान बुद्ध यांना हिंदू धर्मात भगवान विष्णूंचे नववे अवतार मानले जाते. त्यांना एक उपदेशक या रूपाने ओळखले जाते जे अहिंसेचा उपदेश करतात.
दहावा अवतार : कल्की
भगवान विष्णूंचा दहावा अवतार जो
त्यांनी अजून घेतला नाही तो आहे कल्की. काल्कीला भगवान विष्णूचा शेवटचा अवतार
मानतात जो प्रत्येक काळ्या युगाच्या शेवटी म्हणजेच कलियुगाच्या शेवटी येतो. ते एका
पांढऱ्या घोड्यावर असतील. त्यांची तलवार धुमकेतुसारखी चमकत राहील. यावेळी अधर्म, लुटमार,
अत्याचार माजेल त्यावेळी कल्की अवतार घेतील. धर्म गायब होईल आणि हे युगचक्र समाप्त
करण्यासाठी व नवीन युगाचाक्र सुरु करण्यासाठी कलियुगाची समाप्ती करतील.
Image source – https://www.ageofkalki.com
हे
होते भगवान विष्णूंचे १० अवतार. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की
सांगा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना ही माहिती जरूर शेयर करा.
0 Comments