ब्रम्हाजींची पूजा का केली जात नाही?

या सृष्टीची रचना ब्रम्हाजीद्वारे केली गेली आहे. जीवसृष्टीतील सर्व जीवांची निर्मिती ब्रम्हाजीनी केली आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की ब्रम्हाजींची पूजा का केली जात नाही? संपूर्ण जगात ब्रम्हाजीचे मोजकेच मंदिर आहेत. यामध्ये राजस्थानमधील पुष्करमधील ब्रम्हाजीचे मंदिर सर्वात प्राचीन मंदिर आहे. ब्रम्हाजीपासूनच वेदांची उत्पत्ती व प्रचार झाला. त्यांच्या चारही हातात एकेक वेद आहेत. परंतु खूप कमी लोक आहेत जे ब्रम्हाजींची पूजा करतात. त्यांची पूजा न करण्याची महत्वाची कारणे आपण जाणून घेऊ.

 


एकदा ब्रम्हाजीना सृष्टीच्या कल्याणासाठी पृथ्वीवर एक यज्ञ संपन्न करायचा होता. यज्ञाची जागा शोधण्यासाठी त्यांनी आपल्या हातातील कमळाला धरतीवर पाठवले.  ते कमळ राजस्थानमधील पुष्कर येथे पडले. कमळ पडल्यामुळे तेथे एका तलावाची निर्मिती झाली व हीच जागा ब्रम्हाजीनी यज्ञासाठी निवडली. या यज्ञासाठी ब्रम्हाजींची पत्नी वेळेवर पोहोचू शकली नाही. या यज्ञासाठी एका स्त्रीची आवश्यकता होती. यज्ञाची वेळ निघून जात होती परंतु अजूनही ब्रम्हाजींची पत्नी तेथे पोहोचली नव्हती.

 

यज्ञ वेळेवर झाला नसता तर त्याचा फायदा झाला नसता. म्हणून ब्रम्हाजीनी तेथील ग्वाला सोबत विवाह केला आणि यज्ञासाठी बसले. यज्ञ सुरु झाल्यानंतर थोड्या वेळाने त्यांची पत्नी सावित्री तेथे आली. आपल्या जागी दुसऱ्या स्त्रीला पाहताच तिला खूप राग आला. तिने ब्रम्हाजींना श्राप दिला की संपूर्ण पृथ्वीवर तुमची कोणीही पूजा करणार नाही व पूजेच्या वेळेस तुमचे कोणीही स्मरण करणार नाही. या यज्ञासाठी भगवान विष्णुंनीदेखील मदत केली होती. म्हणून देवी सरस्वतींनीदेखील विष्णूजींना श्राप दिला की त्यांना आपल्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल. त्यामुळेच भगवान विष्णूंना आपल्या मानव अवतारात १४ वर्ष वनवास काटावा लागला.

 

सावित्रीला इतक्या रागात पाहून सर्वजण घाबरले.  सर्वानी तिला विनंती केली की दिलेला श्राप मागे घ्यावा. राग शांत झाल्यावर सावित्री म्हणाली कि जेथे तुम्ही यज्ञ केला आहे तेथेच तुमची पूजा केली जाईल. त्यामुळेच फक्त पुष्कर येथेच ब्रम्हाजीची पूजा केली जाते. असे मानले जाते की राग शांत झाल्यावर ती जवळच्या एका पहाडावर जाऊन तपस्या करत बसली व ती आजही तेथे आहे. तेथे जाऊन विवाहित महिला आपल्या वैवाहिक जीवनाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतात. पुष्करमधील ब्रम्हाजीचे हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे.

 

अशाच प्रकारच्या महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आम्हाला फेसबुकवर फॉलो करा.


Post a Comment

1 Comments

  1. Harrah's Philadelphia Casino & Racetrack - Mapyro
    Find Harrah's Philadelphia 태백 출장마사지 Casino & 이천 출장안마 Racetrack, Chester, PA, 안동 출장마사지 United States, pictures, 군산 출장샵 location map, reviews and information, 정읍 출장안마 maps, and amenities.

    ReplyDelete